भेंडा : नेवासा तालुक्यातील ७२ विद्यालयातील ५ हजार ८८८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}यावेळी सर्वात जास्त ४६४ विद्यार्थी घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा, तर सर्वात कमी फक्त ६ विद्यार्थी तक्षीला इंग्लिश स्कूल देडगाव येथून परीक्षेला बसले होते. मागील वर्षी १४ विद्यालयाचा निकाल १०० टक्के होता. यावेळी सर्व विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ५ हजार ८८८ पैकी २ हजार ९ विशेष प्रावीण्य, २ हजार ४७५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १ हजार ३३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर ७३ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.