शिर्डी : केवळ साईबाबा संस्थानवर विसंबून न राहता नगरपंचायतने शहराच्या विविध भागात लसीकरण केंद्र सुरू करावे, तसेच आरोग्याच्या दृष्टीने शहरात औषध फवारणी व फॉगिंग करावी, अशी मागणी शिर्डी शहर राष्ट्रवादीच्या वतीने नगरपंचायतला करण्यात आली.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन दिले. शिर्डीत लसीकरणाला गती देऊन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला उंबरठ्यावर रोखण्यासाठी साई संस्थान बरोबरच नगरपंचायतने ही किमान तीन ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
याशिवाय पावसाळा असल्याने शहरात जागोजागी पाणी साठून डासांचे प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात रोगराई फैलाव परवडणारा नाही. यामुळे नगरपंचायतने डासांचा बंदोबस्त करण्यासाठी शहरात फवारणी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे दीपक गोंदकर, गणेश गोंदकर, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल जगताप, राहुल कुलकर्णी, अजित जगताप, सईभाई शेख, शायद सय्यद, सचिन लक्ष्मण गव्हाणे, समीर शेख, राहुल फुंदे, लक्ष्मण गव्हाणे, निलेश जाधव, अभिराज कोते, डॉ. स्वप्नील वाघ आदी उपस्थित होते.