महापालिकेचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:20+5:302021-09-02T04:47:20+5:30

अहमदनगर : ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगर महापालिकेचे कामकाज बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा ...

Municipal Corporation stalled | महापालिकेचे कामकाज ठप्प

महापालिकेचे कामकाज ठप्प

अहमदनगर : ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगर महापालिकेचे कामकाज बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रशासकीय कामकाज दिवसभर बंद होते. प्रमुख अधिकारी उपस्थित होते, मात्र कर्मचारी गैरहजर असल्याने काम बंद होेते.

कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम बंद ठेवून बाहेर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार महापालिकेत काम करणारे कर्मचारी प्रवेशव्दारावर जमले. अध्यक्ष लोखंडे यांनी ठाणे येथील घटनेची कर्मचाऱ्यांना माहिती दिली. या घटनेच्या निषेधार्थ काम बंद ठेवण्याची सूचना लोखंडे यांनी मांडली. त्यास कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. कर्मचारी काम न करता कार्यालयाबाहेर निघून गेले. महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेला मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. ही सभा संपल्यानंतर कर्मचारी निघून गेले. आयुक्त शंकर गोरे यांच्यासह उपायुक्त यशवंत डांगे हे कार्यालयात उपस्थित होते. परंतु, कर्मचारी उपस्थित नसल्याने दिवसभर कामकाज बंद होते.

Web Title: Municipal Corporation stalled