शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंनीच निवडला गडाचा उत्तराधिकारी

By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST

पाथर्डी : भगवानगडाचे सध्याचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांना अमेरिकेला जायचे होते. मात्र मुंडे यांनीच शास्त्री यांच्यातील गुण हेरून गडाचे महंत होण्याची सूचना केली.

पाथर्डी : भगवानगडाचे सध्याचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांना अमेरिकेला जायचे होते. मात्र मुंडे यांनीच शास्त्री यांच्यातील गुण हेरून गडाचे महंत होण्याची सूचना केली. भिमसिंह महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शास्त्री यांच्या निवडीची मुंडे यांनीच घोषणा केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडावर आणण्याचे स्वप्नही आता अधुरे राहिले आहे. भगवानगड, विजया दशमी, गोपीनाथ मुंडे यांचे अतुट नाते होते. भगवानगडावर गोपीनाथ मुंडे दर दसरा मेळाव्याला आवर्जुन उपस्थित रहायचे. काहीही झाले तरी मुंडे दसरा मेळाव्याला येणारच, अशी खात्री असल्याने दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येत भाविक यायचे. गडाच्या विकासासाठी त्यांनी तन मन धनाने प्रयत्न करून गडाचे नाव देशभर नेले. भगवानबाबांवर त्यांची अपार श्रध्दा होती. बाबांच्या नावाने त्यांनी पोस्टाचे तिकीट काढण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसापूर्वीच त्यांनी भगवानगडावर येवून बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याठिकाणी गडाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला. या सोहळ्यात मुंडे यांनी सन 2015 साली होणार्‍या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते.भगवानगडाचा झालेला विस्तार मुंडे यांच्यामुळेच होता. गोपीनाथ मुंडे यांनीच गडावर मोठे मोठे सप्ताह घडवून आणले. भगवानबाबा यांच्याइतकीच भाविकांची मुंडे यांच्यावर अपार श्रद्धा होती. मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त भगवानगडावर समजताच भक्तांना मोठा धाक्काच बसला. गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री गडावर उपस्थित होते. त्या ठिकाणी जमलेल्या भावीकांनी आज दिवसभर अन्नाच्या एका कणाला सुध्दा हात लावला नाही. भाविकांनी टाहो फोडला. (तालुका प्रतिनिधी)