शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:34 IST

मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.

बाळासाहेब काकडे। श्रीगोंदा : मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.अविनाश हा २०१० ला मुंबई पोलीस दलात भरती झाला. सध्या तो कमांडो पथकात काम करत आहे. मात्र ज्या जागरण गोंधळ पार्टीने शिकण्यासाठी बळ दिले. त्या जागरण गोंधळ पार्टीत मुंबईचा हा कमांडो कधी वाघ्या तर कधी संबळ वादकाचे काम करत आहे. देऊळगाव येथील विलास व अनुसया जाधव यांचा पिढीजात जागरण गोंधळ पार्टीचा व्यवसाय आहे. त्यांना दीपाली व अविनाश ही दोन मुले आहेत. अविनाश दोन वर्षाचा असतानाच विलास यांचे निधन झाले. अनुसया यांनी जागरण गोंधळामध्ये मुरळीचे काम चालू ठेवले. या माध्यमातूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.अविनाश हा लहानपणी सुट्टीत जागरण गोंधळ पार्टीत जायचा. देऊळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथील दादा चंदर गोसावी (काका) यांच्याकडे पाठवले. अकरावी, बारावी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात झाली. अविनाश हा मुंबई पोलीस दलात भरती झाला. अविनाशने मुंबई विद्यापीठात बी. ए. केले. सध्या तो क्यूआरटी पथकात कमांडो म्हणून सेवा करीत आहे. त्याची बहीण दीपालीचा विवाह झाला असून तीही श्रीगोंदा शहरात ब्युटी पार्लरचे काम करते. अविनाशचा पदवीधर प्राचीबरोबर विवाह झाला. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. अविनाश लहानपणापासून जागरण गोंधळ पार्टीत काम करण्याची आवड आहे. त्याने लोककला जोपासण्यासाठी जागरण गोंधळ पार्टीत काम करणे सुरूच ठेवले आहे. तो काम सांभाळून या पार्टीत काम करतो. सुटीत जागरण गोंधळाचे काम किल्लारीला भूकंप झाला. त्या दरम्यान पतीचे निधन झाले. अविनाश व दीपालीला गरिबीचे चटके बसले. तरही मुले शिकली. अविनाश मुंबईत पोलीस झाला. तो गावी सुटीला आला की माझ्याबरोबर जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे देऊळगावच्या अनुसया धुमाळ यांनी सांगितले. आईसाठी शिकलो लोककलामाझ्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. आईने जागरण गोंधळ पार्टीत असताना मला मुरळी, संबळ वादन, वाघ्याचे काम शिकविले. त्यामुळे तिला मदत व्हायची. याशिवाय काकांनी आधार दिला. त्यामुळे पोलीस दलात जाऊ शकलो. आज त्यांना आधार व्हावा व लोककला जोपण्यासाठी सुटीच्या काळात जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी अविनाश धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़.

टॅग्स :artकलाshrigonda-acश्रीगोंदा