मोटारसायकल चोरीतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:59+5:302021-09-08T04:26:59+5:30
श्रीरामपूर : चोरलेल्या मोटारसायकलची विक्री करणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी पकडले. तपासामध्ये त्याच्याकडून मोटारसायकल चोरांची माहिती मिळाली. पोलिसांनी टोळीतील ...

मोटारसायकल चोरीतील
श्रीरामपूर : चोरलेल्या मोटारसायकलची विक्री करणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी पकडले. तपासामध्ये त्याच्याकडून मोटारसायकल चोरांची माहिती मिळाली. पोलिसांनी टोळीतील आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १० मोटारसायकल व एक जीप जप्त केली. आरोपी योगेश रमेश हिवाळे (रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) हा चोरलेली मोटारसायकल विक्रीसाठी येत होता. पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त खबऱ्याकडून ही माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
आरोपी हिवाळे याच्याकडून दोन मोटारसायकल मिळून आल्या. त्याने तपासात टोळीतील साथीदारांची नावे सांगितली. सचिन राधू शिंदे (रा. राहुरी), जावरे बशीर सय्यद (रा. राहुरी) व रामनाथ वसंत गायकवाड (रा. पढेगाव) यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध शिर्डी, राहुरी, मनमाड या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत.
--------------