शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लग्न लावून लाखो रुपये उकळणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST

कर्जत : बनावट लग्न लावून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा म्होरक्या, बनावट नवरी यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. ...

कर्जत : बनावट लग्न लावून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा म्होरक्या, बनावट नवरी यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी फरार आहेत.

याप्रकरणी कर्जत पोलिसांत राजू वैजनाथ हिवाळे (रा. सिंहरोड, पुणे), विलास जोजरे (रा. हिंगोली), मंगलबाई दत्तात्रय वाघ (रा. पोखर्णे, सोनपेठ, परभणी), पल्लवी गोमाजी सगट (रा. मोहाला, सोनपेठ, परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कर्जत तालुक्यातील एका गावातील मुलाचे लग्न जमविण्यासाठी मुलाच्या वडिलांनी स्थळांबद्दल चौकशी केली होती. त्यानुसार राजू वैजनाथ हिवाळे, विलास जोजरे, मंगलबाई दत्तात्रय वाघ, पल्लवी गोमाजी सगट यांनी लग्न जुळविले होते. त्यासाठी त्यांनी दोन लाख दहा हजारांची रक्कम मागविली होती. ती रक्कमही देण्यात आली. त्या महिलेचे अगोदरच तीन लग्न झाले होते. ही माहितीही लपवून ठेवण्यात आली होती. तसेच लग्नही कायदेशीर पद्धतीने न करता घाईघडबडीत उरकण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये फिर्यादीची दोन लाख दहा हजारांची फसवणूक झाली. यापैकी साठ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती काळे करत आहेत.

--

घाईगडबडीत लग्न करू नका...

मुला-मुलींच्या आई-वडिलांनी समोरच्यांची खात्री करूनच लग्न लावले पाहिजे. अशा प्रकारे घाईगडबडीत लग्न लावून देणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. असे काही एजंट असल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.