शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी,सिंघम ड्रेसची चलती

By admin | Updated: October 18, 2014 23:47 IST

अहमदनगर : दिवाळी आली की कपडे खरेदीचे वेध सर्वांनाच लागतात़ यावर्षी कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असून, लहान मुलांसाठी यावर्षी नव्यानेच मोदी ड्रेस बाजारात दाखल झाले आहेत़

अहमदनगर : दिवाळी आली की कपडे खरेदीचे वेध सर्वांनाच लागतात़ यावर्षी कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असून, लहान मुलांसाठी यावर्षी नव्यानेच मोदी ड्रेस बाजारात दाखल झाले आहेत़ मोदी ड्रेस, सिंघम ड्रेस, राजनिती ड्रेसला बालकांकडून मोठी मागणी असल्याचे विके्रते सांगतात़ यावर्षी कापड खरेदी-विक्रीतून दहा कोटीपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे़दिवाळीत कापड खरेदी मोठ्या प्रमाणावर होते़ शहरात २०० हून अधिक कापड दुकाने असून, कापड खरेदीसाठी सध्या बाजारात मोठी गर्दी होत आहे़ सहामाही परीक्षा संपल्यामुळे आणि निवडणुकीची धांदल उरकल्यामुळे सध्या बाजारात कापड खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे़ महिला वर्गाकडून डिझायनर व एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साड्यांना मोठी मागणी असून, कश्मिरी साड्याही महिला आवर्जून खरेदी करतात, असे विक्रेत्यांनी सांगितले़पुरुष वर्गाकडून जीन्स, शुटींग कपड्यांना मोठी मागणी आहे़ तरुणांमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेले शर्ट घेण्याचा ट्रेंड अजूनही आहे़ लहान मुलांमध्ये कपडे खरेदीची उत्सुकता मोठी असते़ यंदा प्रथमच बाजारात मोदी ड्रेस आला आहे़ मोदी ड्रेस खरेदीसाठी मुलांची सर्वाधिक पसंती आहे़ त्यानंतर सिंघम ड्रेस व राजनिती ड्रेसला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़