कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना मिहाळी नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:01+5:302021-09-08T04:27:01+5:30

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत ऑनलाइन कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव शेजूळ, राजदेव स्वामिदत्त, विकास गव्हाणे, ...

Mihali job to students through campus interview | कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना मिहाळी नोकरी

कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना मिहाळी नोकरी

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत ऑनलाइन कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव शेजूळ, राजदेव स्वामिदत्त, विकास गव्हाणे, अक्षय कोते, अनिकेत नवले, अनुजा कोते व प्रतीक्षा दहातोंडे यांची निवड झाली आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागामार्फत दरवर्षी नामांकित कंपन्यांना बोलावून थेट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच सद्य:स्थितीतील उपलब्ध नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाते. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार यशवंतराव गडाख, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. व्ही.के. देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास घावटे, प्लेसमेंट विभाग प्रमुख ए. व्ही. घुले आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: Mihali job to students through campus interview