हुंड्याच्या पैशासाठी पेटून दिल्याने उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:39+5:302021-07-30T04:22:39+5:30

कोपरगाव : पाच महिन्यापूर्वी लग्न होऊन सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी व संसार उपयोगी वस्तू आणण्यासाठी माहेराहून दोन ...

Married woman dies during treatment for dowry money | हुंड्याच्या पैशासाठी पेटून दिल्याने उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

हुंड्याच्या पैशासाठी पेटून दिल्याने उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

कोपरगाव : पाच महिन्यापूर्वी लग्न होऊन सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी व संसार उपयोगी वस्तू आणण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी २६ जुलै २०२१ ला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मारहाण करुन पेटवून दिले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घडली. पीडित महिलेवर राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे बुधवारी ( दि. २८ ) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पूजा निखिल म्हेत्रे ( वय ३५ , रा. जेऊर कुंभारी, कोपरगाव ) मृत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी पांडुरंग रामभाऊ लोंढे ( वय- ५१, रा. लिंगटांगवाडी, ता. सिन्नर जि. नाशिक ) यांच्या फिर्यादीवरून मयतेचा पती निखिल विलास म्हेत्रे , सासरे विलास निवृत्ती म्हेत्रे , सासू लता विलास म्हेत्रे , दीर आशिष विलास म्हेत्रे , दीर स्वप्नील विलास म्हेत्रे , जाव रेखा स्वप्नील म्हेत्रे ( सर्व रा. जेऊर कुंभारी ता. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहेत.

Web Title: Married woman dies during treatment for dowry money