शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तकृपा कोविड सेंटरमुळे वाचले अनेकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

करंजी : कोरोना संकटाची चाहूल लागताच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून दत्तकृपा कोविड सेंटर सुरू केले. ...

करंजी : कोरोना संकटाची चाहूल लागताच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून दत्तकृपा कोविड सेंटर सुरू केले. या कोविड सेंटरमुळे मिरी-करंजी परिसरातील शेकडो कोरोनाबाधितांचे प्राण वाचले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरी-करंजी परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. परिसरातील लहान-मोठ्या गावांत शेकडो ग्रामस्थ बाधित होत होते. अशा रुग्णांना नगर व शहर परिसरात उपचारासाठी जावे लागत होते. तेथे काहींना बेड मिळत नसत किंवा वेळेत उपचार मिळत नसत. त्यामुळे काही ग्रामस्थांचा मृत्यूही झाला. रुग्णांची संख्याही वाढू लागली होती. त्यानंतर मिरी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दत्तकृपा कोविड सेंटर उभे केले.

कोरोना रुग्णांची नि:स्वार्थ सेवा होत असल्याचे पाहून मिरी परिसरातील ग्रामस्थांसह अनेक दानशूर व्यक्तींनी मोठी मदत केली. गावात घराघरांतून पलंग व बाजांची मागणी करण्यात आली. आजही या कोविड सेंटरमध्ये परिसरातील पन्नासहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. येथील कोविड सेंटरला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

राजकारण करता-करता आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेवून अनेक लहान-मोठे कार्यकर्ते कोरोनाच्या संकटात असताना समाजाची सेवा करीत आहेत. मिरी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी ग्रामस्थांच्या मदतीने अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. या कोविड सेंटरमुळे मिरी - करंजी परिसरातील खेड्या-पाड्यापासून ते वाड्या- वस्त्यांना विळखा घालून बसलेल्या कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात का होईना यश आले आहे. त्यामुळेच परिसरातील रुग्णांची संख्या कमी होण्यास मदतच झाली नव्हे तर परिसरातील रुग्णांची गैरसोय टळून अनेकांचे प्राण वाचले.

--

राजकारण करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याचे भान लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी ठेवल्यास समाजावर कितीही मोठे संकट आले तरी दूर करता येते. त्यामुळे मी स्वतः ग्रामस्थांसह येथील रुग्णांची देखभाल करतो.

-राहुल गवळी,

सदस्य, पंचायत समिती, पाथर्डी

---

०२ मिरी कोविड सेंटर

मिरी येथील दत्तकृपा कोविड सेंटरमधील रूग्णांची पाहणी करताना राहुल गवळी व इतर.