लालटाकी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:22+5:302021-03-22T04:20:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुळानगर व पंपिंग स्टेशन परिसरातील विद्युत पुरवठा ...

Low pressure water supply in Laltaki area | लालटाकी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

लालटाकी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुळानगर व पंपिंग स्टेशन परिसरातील विद्युत पुरवठा रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खंडित झाला होता. त्यामुळे पाणीउपसा काही वेळासाठी बंद होता. पाणीपुरवठा टप्प्याने सुरळीत होत असून, लालटाकी परिसरात सोमवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ आदी भागास सोमवारी पाणीपुरवठा होत असतो. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीउपसा काही वेळासाठी बंद होता. त्यामुळे या भागात सोमवारी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. विळद येथील पूर्ण क्षमतेने पाणीउपसा होण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे.

त्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

....

Web Title: Low pressure water supply in Laltaki area