याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अंबरनाथ अर्जुन सांगळे (वय ४१, रा. सिन्नर, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगळे हे शुक्रवारी रात्री नगर येथून सिन्नर येथे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकाजवळ वाहनाची वाट पाहत होते. यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या कारचालकाने तुम्हाला सिन्नर येथे सोडतो असे सांगून कारमध्ये बसविले. या कारमध्ये आधी दोन जण बसलेले होते. या तिघांनी दमदाटी करून सांगळे यांना निमगाव वाघा परिसरात नेऊन तेथे त्यांना लोखंडी गजाने मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल, पॅन कार्ड, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. तसेच एटीएम कार्डचा पिन क्रमांक विचारून घेत त्यांच्या खात्यातून १२ हजार २०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.