रेल्वे मार्गासाठी प्रसंगी जनआंदोलन छेडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:39+5:302021-06-10T04:15:39+5:30

नियोजित प्रस्तावित हायस्पिड रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून व्हावा या मागणीचे निवेदन प्रमोद मंडलिक, नितीन नाईकवाडी, सतीश भांगरे, सुरेश नवले, ...

Let's start a people's movement for the railway line | रेल्वे मार्गासाठी प्रसंगी जनआंदोलन छेडू

रेल्वे मार्गासाठी प्रसंगी जनआंदोलन छेडू

नियोजित प्रस्तावित हायस्पिड रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून व्हावा या मागणीचे निवेदन प्रमोद मंडलिक, नितीन नाईकवाडी, सतीश भांगरे, सुरेश नवले, महेश नवले, सुनील पुंडे, गणेश कानवडे, शुभम आंबरे, अमोल पवार, चंद्रकांत आंबरे, किरण देशमुख, गणेश शिंदे, विशाल नाईकवाडी, रमेश भालेराव, नवनाथ आवारी आदींनी तहसीलदार यांना दिले.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग २३५ किलोमीटर लांबीचा असून याचा खर्च १६ हजार कोटींचा आहे. यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केल्यानेच अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला. प्रस्तावित मार्ग हा अकोले-देवठाण अशा पद्धतीने जात असतांना त्याच्या डिझाईनमध्ये बदल करून तो संगमनेर मार्गे नेला. परिणामी शासनाच्या खर्चात तर वाढ होणार आहे.

खरे तर हा मार्ग प्रस्तावित मार्गान्वये अकोले तालुक्याच्या मध्यावरून जात होता. जो अकोलेसह संगमनेर तालुक्यासाठी अत्यंत फायद्याचा होता. ज्यामुळे अकोले तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळाली असती परिणामी बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली असती. या सर्व गोष्टीवर पाणी फिरवून मार्गाचे अंतर, प्रवासाचा वेळ, खर्च या सर्वांमध्ये नवीन मार्गामुळे वाढ झाली. म्हणून हे सर्व वाचविण्याचे दृष्टीने पूर्वीच्या असलेल्या प्रस्तावित मार्गानुसारच रेल्वे मार्ग व्हावा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Let's start a people's movement for the railway line