शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गाव पुढाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

केडगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गाव पुढारी, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणणे, वशिल्यावर ...

केडगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गाव पुढारी, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणणे, वशिल्यावर लस देणे यासाठी दमबाजी करणे, व्हॉट‌्सॲपवर बदनामीकारक मजकूर पसरविणे, असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. या पुढील काळात असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला.

नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी उपलब्ध असून, नागरिकांना लसीकरण सुरळीतपणे सुरू आहे. तालुक्यात एकूण नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय, चिचोंडी पाटील येथे असून, जिल्हा परिषदमार्फत ज्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतात, त्यानुसार ग्रामपातळीवर नियोजन करून नागरिकांना तत्काळ लस देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत करण्यात येते. आजअखेर वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उत्कृष्ट काम केले असून, लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव तसेच दमबाजी करणे, व्हॉट‌्सॲपवर बदनामीकारक मजकूर पसरविणे, असे प्रकार घडल्याबाबतच्या तक्रारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी केल्या आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

उपलब्ध लसीचे प्रमाण मर्यादित असल्याने लसीकरण पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. तरी नागरिकांनी लसीकरणादरम्यान सहकार्य करावे, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना सहकार्य करावे. लसीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.