नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मणराव जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:25+5:302021-02-05T06:29:25+5:30
नेवासा : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे गटनेते लक्ष्मणराव जगताप हे तीन मतांनी विजयी झाले. त्यांचे ...

नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मणराव जगताप
नेवासा : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे गटनेते लक्ष्मणराव जगताप हे तीन मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे गटनेते सचिन नागपुरे यांना सहा मते मिळाले.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नगरपंचायतीच्या उपनागध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत लक्ष्मणराव जगताप विजयी झाले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहायक म्हणून प्रभारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी काम पाहिले.
उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी नुकताच राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
उपनगराध्यक्षपदासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते लक्ष्मणराव जगताप व भाजप-काँग्रेस गटाचे गटनेते सचिन नागपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्यात सरळ लढत होऊन मतदान घेण्यात आले. यावेळी क्रांतिकारीच्या वतीने नगराध्यक्षा योगिता पिंपळे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अर्चना कुऱ्हे, सचिन वडागळे, अंबिका ईरले, संदीप बेहळे, श्रीमती फिरोजबी पठाण, फारूक आतार, स्व:त लक्ष्मणराव जगताप असे मतदान झाले. भाजपच्या वतीने उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवीत असलेले गटनेते सचिन नागपुरे यांना नगरसेविका शालिनी सुखधान, अनिता डोकडे, डॉ. निर्मला सांगळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे व स्व:त ते असे मतदान झाल्याने विरोधी गटाला सहाच मते मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका सीमा मापारी, माजी नगराध्यक्षा संगिता बर्डे अनुपस्थित होत्या.
फोटो : २७ लक्ष्मण जगताप