शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

शहीद विघावेंना अखेरचा निरोप

By admin | Updated: July 5, 2023 11:08 IST

श्रीरामपूर : नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भू-सुरूंगाच्या स्फोटात शहीद झालेले दीपक रतन विघावे (वय ३७) यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 श्रीरामपूर : गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी या नक्षलवादी परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भू-सुरूंगाच्या स्फोटात शहीद झालेले खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथील पोलीस जवान दीपक रतन विघावे (वय ३७) यांच्यावर सरकारी इतमामात त्यांच्या खंडाळा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना अखेरची सलामी देण्यात आली. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अशोकनगर फाटा येथील हेलिपॅडवर त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अपर अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे, उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक सुरेश सपकाळे, कैलास फुंडकर, माजी सभापती सुनीता गायकवाड, उपसभापती कैलास कणसे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन गुजर, जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, सिद्धार्थ मुरकुटे, सोपान राऊत हजर होते. श्रीरामपूर नगरपालिकेच्या सजविलेल्या रूग्णवाहिकेतून शहीद जवान विघावेंचे पार्थिव हेलिपॅडवरुन श्रीरामपूर शहरात आणण्यात आले. शहरातून मिरवणूक काढून नंतर खंडाळा येथे ते नेण्यात आले. श्रीरामपूर ते खंडाळा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वीर पिता रतन विघावे, वीरपत्नी ज्योती, त्यांचा मुलगा यश, मुलगी खुशी यांच्यासह जवळच्या आप्तेष्ठांना पार्थिव पाहून हुंदका आवरणे कठीण झाले होते. खंडाळा गावातून मिरविल्यानंतर पार्थिवदेहाची पेटी स्मशानभूमीत तयार केलेल्या मंचावर ठेवण्यात आली. तेथे आमदार कांबळे, मुरकुटे, ससाणे, गुजर, दिघे, सरकारी अधिकार्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)