शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचा दिवसही थेट भेटीचाच, शक्ती प्रदर्शन अनेकांनी टाळले

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावली़

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावली़ गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून राजकीय रणांगण पेटविणाऱ्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मात्र, शक्ती प्रदर्शन करणे टाळले़ शिवसेना, भाजपाने स्टार प्रचारकांची सभा घेवून सांगता केली़ नेहमीप्रमाणे मात्र, या सभांमध्ये शक्ती प्रदर्शनाचा ज्वर दिसला नाही़ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी भेटीगाठीवरच भर दिला़ त्यांनी सभा अथवा रोड शो केला नाही़ शहरातील माणिक चौक येथे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेची वेळ दुपारी तीनची होती़ हुसेन प्रत्यक्षात पोहोचले सायंकाळी साडेचार वाजता़ त्यांनी बारा मिनिटात भाषण आटोपते घेतले़ शिवसेनेने अभिनेते डॉ़ अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन केले होते़ भिस्तबाग चौकात चौक सभा घेवून त्यांनी प्रचाराची सांगता केली़ उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून शहरात विविध पक्षांनी नेत्यांच्या जाहीर सभा, चौक सभा, रोड शो, बैठकांचा धडाका सुरू केला होता़ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे उमेदवार मोठे शक्ती प्रदर्शन करतील असा सर्वांचा अंदाज होता़ सर्वच उमेदवारांनी शेवटच्या दिवशीही ‘थेट भेट’ वरच लक्ष केंद्रित करत मतदारांशी संवाद साधला़ जाहीर प्रचार जरी थंडावला असला तरी आता पुढील नियोजनाला वेग आला असून, उमेदवारांसाठी येणारे काही तास जागता पहारा करावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)