शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची लेक सीमेवर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST

अहमदनगर : भारतात ओटीए, नौदल अकादमी, हवाई दल अकादमीत मुलींना सशस्त्र दलात संधी दिली जाते ; मात्र तिन्ही दलांसाठी ...

अहमदनगर : भारतात ओटीए, नौदल अकादमी, हवाई दल अकादमीत मुलींना सशस्त्र दलात संधी दिली जाते ; मात्र तिन्ही दलांसाठी लागणारे अधिकारी तयार करणाऱ्या एनडीएमध्ये मुलींना प्रवेश नव्हता. परंतु आता न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहे. त्यामुळे मुलीही सीमेवर लढताना दिसणार आहेत.

भारतात महिलांंना १९९२ पासून लष्करात संधी देण्यात आली. प्रारंभी केवळ पाच वर्षे त्यांना सेवा करता येत होती. त्यानंतर यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली ; मात्र लष्करात करिअर करू पाहणाऱ्या महिलांना काही वर्षांत निवृत्त व्हावे लागत होते. यामुळे या निर्णयाविरोधात लष्करी सेवेत शॉर्ट सर्व्हिस पूर्ण केलेल्या महिलांना कायमस्वरूपी पदावर पदोन्नती मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून काही महिला अधिकाऱ्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. या लढ्याला यश आल्याने मुलींनाही आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत संधी मिळण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा करून दिला आहे.

------------------असा आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत मुलांप्रमाणे एनडीएची परीक्षा मुलींना देता येईल, असे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मुलींना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसण्याची मुभा दिली जाणार आहे. ही परीक्षा दिल्यानंतर एसएसबी मुलाखत आणि शारीरिक चाचणीत ही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जूनमध्ये त्यांना एनडीएत प्रवेश मिळेल.

-------------

असा होतो लष्करात प्रवेश...

बारावीनंतर एनडीए आणि पदवी स्तरावर आयएमएचे प्रवेश होतात. आयएमए प्रवेशाला थेट कमिशन, तर ओटीएमध्ये नॉन टेक्निकलसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन मार्फत प्रवेश दिला जातो. अभियांत्रिकी पूर्ण केलेल्यांना सैन्य दलातील अभियंते, सिग्नल क्षेत्रात संधी असते. मुलींसाठी प्रवेशाची प्रक्रिया वेगळी असून, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा होतात. निवडीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते.

----------

संरक्षण दलात अधिकारी होण्याची लहानपणापासूनच इच्छा आहे. ती आता एनडीए संदर्भातील न्यायालयाच्या निकालामुळे पूर्ण होईल असे वाटते.

- सुनीता इकडे, एनसीसी छात्र, दादा पाटील काॅलेज

---------------

ग्रामीण भागातील मुलींमध्ये गुणवत्तेची कमी नाही. मुलांप्रमाणे मुलींनाही आता एनडीएत प्रवेश खुला झाला आहे, याचा अभिमान वाटतो.

- राधाबाई कदम, एनसीसी छात्र, दादा पाटील काॅलेज

-------------

भारतात लष्करी सेेवेची मोठी परंपरा आहे. सेनादलात जाणे हे मानाचे व प्रतिष्ठेचे समजले जाते. एनडीएतून लष्करात जाण्याची संधी मिळाली तर ते माझे भाग्य असेल.

- कल्याणी बोरा, एनसीसी छात्र, दादा पाटील काॅलेज

--------------

मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. सेनादलात पदवीनंतर प्रवेश दिला जात होता. परंतु आता एनडीए मार्फत प्रवेश मिळणार असल्याने सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

- वर्षा पंडित, एनसीसी छात्र, दादा पाटील काॅलेज