हॉटेलमध्ये सुरू होता कुंटणखाना: पोलिसांनी टाकला छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:10+5:302021-07-15T04:16:10+5:30

मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अनिल माणिकराव कर्डिले (वय ५२) व त्याचा मुलगा अक्षय अनिल ...

Kuntankhana was started in the hotel: Police raided | हॉटेलमध्ये सुरू होता कुंटणखाना: पोलिसांनी टाकला छापा

हॉटेलमध्ये सुरू होता कुंटणखाना: पोलिसांनी टाकला छापा

मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अनिल माणिकराव कर्डिले (वय ५२) व त्याचा मुलगा अक्षय अनिल कर्डिले (वय २५ दोघे रा. खंडागळा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हॉटेल राजयोग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी सुटका करण्यात आलेल्या तीन परप्रांतीय मुलींना स्नेहालय संस्थेत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी फिर्याद दिली असून, सहायक निरीक्षक सानप हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, नगर-पुणे रोडवरील काही हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने राजरोसपणे वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Kuntankhana was started in the hotel: Police raided