खरवंडी कासारचा पूल तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:25+5:302021-09-08T04:27:25+5:30
गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हा पूल कोसळला आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. ...

खरवंडी कासारचा पूल तुटला
गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हा पूल कोसळला आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी असलेली खरवंडी कासार ही परिसरातील २० ते २५ गावांची मुख्य बाजारपेठ असल्याने येथे ग्रामस्थांचा मोठा वावर असतो. आमदार मोनिका राजळे यांच्याकडे खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील व वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार यांनी या पुलाचा प्रश्न मांडला आहे. आ. राजळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपअभियंता दिलीप तारडे
यांनी पुलाची पाहणी केली असून येत्या काही दिवसांत पुलाची दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. योगेश कुदंलवाडिकर, योगेश सुपेकर, ग्रा. सदस्य महारुद्र, दादाराव खेडकर आदी उपस्थित होते.
फोटो ०७ खरवंडी कासार
ओळी-खरवंडी कासार येथील तुटलेल्या पुलाची पाहणी करताना अभियंता दिलीप तारडे. समवेत बाळासाहेब गोल्हार, महारुद्र कीर्तने व ग्रामस्थ.