केडगाव जागरूक मंचची हरित नगर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:02+5:302021-07-12T04:15:02+5:30

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचने गेल्या दोन वर्षांपासून राबविलेल्या हरित केडगाव या वृक्षारोपण मोहिमेस स्थानिक नगरसेवक व जनतेने ...

Kedgaon Awareness Forum's Green City Campaign | केडगाव जागरूक मंचची हरित नगर मोहीम

केडगाव जागरूक मंचची हरित नगर मोहीम

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचने गेल्या दोन वर्षांपासून राबविलेल्या हरित केडगाव या वृक्षारोपण मोहिमेस स्थानिक नगरसेवक व जनतेने भरभरून दिलेल्या प्रतिसाद व सहकार्यामुळे केडगावात ही मोहीम यशस्वी होत आहे. उपमहापौर गणेश भोसले यांच्या हरित नगर या आवाहनाला प्रतिसाद देत मंचच्या वतीने नगर येथील ओम गार्डन या ठिकाणी वृक्षारोपण करून मोहिमेस सुरुवात केली. मोहिमेअंतर्गत वड, पिंपळ, करंज, कडूनिंब, चिंच, बदाम असे वृक्ष लागवड होत आहे. प्रसंगी मंचचे सदस्य प्रवीण पाटसकर, शारदा शिरसाठ, गणेश पाडळे, शशिकांत उमाप, धनराज पवार, श्रीकांत पाचारणे, प्रदीप पवार, संत निरंकारी जामखेड तालुका समन्वयक अमित गंभीर, उद्योजक पीयूष गंभीर, रवी जमदाडे, ओम गार्डनचे संचालक शशांक पवार, बाळासाहेब काटे, संपत राऊत, जावेद शेख, विशाल थरकुडे व मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे उपस्थित होते.

Web Title: Kedgaon Awareness Forum's Green City Campaign