शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:41 IST

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अशोक मोरे । करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.   पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, भोसे, लोहसर, दगडवाडीसह अनेक गावात जोरदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करणा-या विहिरींना अद्यापही पाणी वाढले नाही. या भागातील २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. या योजनेव्दारे एक-एक महिना पाणी पुरवठा होत नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या या संस्थेची चौकशी करुन ही संस्था बरखास्त करून योजना शासनाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी होत आहे. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, मिरी, तिसगाव परिसरातील गावात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असते. यामुळे या भागातील २७ गावांना मुळा धरणातून पाणी आणून पांढरी पुलावरील टाकीत पाणी सोडण्यात येते. तेथून या गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू नियोजनाच्या अभावामुळे या योजनेला १-१ महिना पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने  मागील आठवड्यात टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. संस्था बरखास्त करण्याची मागणीपिण्याच्या पाण्याची योजना असूनही ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या संस्थेची चौकशी करून संस्था बरखास्त करावी, अशी मागणी प्रकाश शेलार, संदीप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र मरकड, राजेंद्र अकोलकर, बाबा मोरे, अशोक टेमकरसह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.विद्युत मोटारी जळाल्या करंजी-मिरी-तिसगाव पाणी पुरवठा करणा-या योजनेच्या विद्युत मोटारी जळाल्या होत्या. आता त्या दुरुस्त करण्यात आल्या असून योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.    दिवाळीत करंजीत पाणी टंचाई करंजी-मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक महिन्यापासून बंद आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर करंजी परिसरातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण आहे. पाणी योजनेचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे ही संस्था बरखास्त करावी, असे ग्रामस्थ प्रकाश शेलार यांनी सांगितले.      

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर