अवघ्या तीन मिनिटात प्रवेश

By Admin | Updated: June 15, 2014 00:31 IST2014-06-14T23:09:49+5:302014-06-15T00:31:19+5:30

राहुरी : राहुरी महाविद्यालय हे दिवसेंदिवस हायटेक होत असून डाटाबेस आॅनलाईन प्रणालीचा वापर करणारे राहुरी महाविद्यालय पुणे विद्यापीठात पहिले आहे़ या प्रणालीचा वापर करुन अवघ्या तीन मिनिटात

Just enter in three minutes | अवघ्या तीन मिनिटात प्रवेश

अवघ्या तीन मिनिटात प्रवेश

राहुरी : राहुरी महाविद्यालय हे दिवसेंदिवस हायटेक होत असून डाटाबेस आॅनलाईन प्रणालीचा वापर करणारे राहुरी महाविद्यालय पुणे विद्यापीठात पहिले आहे़ या प्रणालीचा वापर करुन अवघ्या तीन मिनिटात अ‍ॅडमिशन घेण्याची सुविधा राहुरी महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिल्याची माहिती प्राचार्य संभाजी पठारे यांनी दिली़
आॅनलाईन प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सभा महाविद्यालयात पार पडली़ प्राचार्य डॉ़ पठारे यांनी आॅनलाईन प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, आनलाईन प्रक्रिया ही इतर महाविद्यालयापेक्षा वेगळ्या प्रकारची आहे़ पुणे विद्यापीठाच्या निकालाचा डाटा बेसचा प्रवेश प्रक्रियेत वापर करणारे राहुरी महाविद्यालय हे पहिले असल्याचे प्राचार्य पठारे यांनी सांगितले़ अवघ्या दोन ते तीन मिनिटात प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती घरबसल्या आपल्या स्मार्ट फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच इंटरनेट कॅफेवरुन भरता येणार आहे़ सुधारित प्रवेश प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थी यांचा मोलाचा वेळ व पैसा वाचणार आहे़ शिवाजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे हे आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आग्रही होते, असे डॉ़ पठारे यांनी सांगितले़
महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोफ त उपलब्ध करुन दिली आहे़ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ़ पठारे यांनी केले़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Just enter in three minutes