बांधकाम कामगारांसाठी जनशक्ती श्रमिक संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:35+5:302021-07-16T04:15:35+5:30

शेवगाव : विविध क्षेत्रात बांधकाम कामगार, कारागिरांची गरज भासते. असे असूनही बांधकाम बिगारी, कुशल-अकुशल कारागीर असंघटित राहिल्यामुळे त्यांना शासनाच्या ...

Janashakti Shramik Sangh for construction workers | बांधकाम कामगारांसाठी जनशक्ती श्रमिक संघ

बांधकाम कामगारांसाठी जनशक्ती श्रमिक संघ

शेवगाव : विविध क्षेत्रात बांधकाम कामगार, कारागिरांची गरज भासते. असे असूनही बांधकाम बिगारी, कुशल-अकुशल कारागीर असंघटित राहिल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला नाही. अशा कामगारांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी जनशक्ती श्रमिक संघाची स्थापना करून असंघटित कामगारांना संघटित केले, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिली.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिले जाणारे ओळखपत्र व सुरक्षा संचाचे वाटप जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बुधवारी कांबी (ता. शेवगाव) येथे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जनशक्तीचे महासचिव जगन्नाथ दादा गावडे, सरपंच नितीन पारनेरे, उपसरपंच सुनीलसिंग राजपूत, सुरेशचंद्र होळकर, रासपचे बाजीराव लेंडाळ, अशोकराव घोलप, मदनसिंग राजपूत, सखाराम घावटे, रफिक शेख, अकबर शेख, सिराज शेख, मोहम्मद सय्यद, मोहनराव शिंदे, दिगंबर गाढवे, किशोर पिसे, दिलीप मगर, इसूब सय्यद, श्रीराम नन्नवरे आदी उपस्थित होते. संजय दुधाडे यांनी प्रास्ताविक केले. अकबर शेख यांनी आभार मानले.

Web Title: Janashakti Shramik Sangh for construction workers