शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘इश्कवाला लव्ह’ टीम सोबत थिरकली तरुणाई

By admin | Updated: September 21, 2014 23:49 IST

अहमदनगर : ‘इश्कवाला लव्ह’ टीमशी संवाद साधताना तरुणाईने जल्लोष केला.

अहमदनगर : झपाटलेला २, दुभंग, अनवट या सिनेमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये जिद्द व चिकाटीचा संदेश देणारा, ‘स्टॅण्डबॉय’ सारख्या हिंदी सिनेमात काम करणाऱ्या आणि ‘इश्कवाला लव्ह’मधून अभिनयाची धमाल सादर करणाऱ्या आदिनाथ कोठारे व त्याच्या ‘इश्कवाला लव्ह’ टीमशी संवाद साधताना तरुणाईने जल्लोष केला. त्यांच्याशी संवाद साधताना निर्माती रेणू देसाई यांनी आपला चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडला.‘इश्कवाला लव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज, जी. एच. रायसोनी कॉलेज, विश्वभारती इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिली. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पाणीग्राही, निर्माती व दिग्दर्शक रेणू देसाई, गायिका आनंदी जोशी सहभागी होते. त्याचबरोबर काही भाग्यवान विजेत्यांना चित्रपटाच्या गाण्यांच्या सीडी व आदिनाथबरोबर ‘सेल्फी’ फोटो काढण्याचा आनंद मिळाला.डॉ. विठ्ठलराव विखे फौंडेशनचे सचिव ले. ज. (रि.) बी. सदानंदा, डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डेप्युटी डायरेक्टर अभिजीत दिवटे. जी. एच. रायसोनीचे सिद्धांत काळे, प्रशांत मुनफन, विश्वभारती इंजि. कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. कुरेशी, गडकर यांनी सत्कार केला.त्यानंतर आदिनाथ कोठारे व रेणू देसाई यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली.अकिरा फिल्मस् व श्री आद्य फिल्मस् निर्मित ‘इश्कवाला लव्ह’ संपूर्ण महाराष्ट्रात १० आॅक्टोबर २०१४ ला प्रदर्शित होत आहे. तसेच बहुचर्चित ‘मंगल अष्टक वन्स मोअर’ फेम रेणू देसाई दिग्दर्शनात पदार्पण करत आहे आणि हा चित्रपट महाराष्ट्र आणि नयनरम्य मॉरिशसमध्ये चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर विनोद प्रधान यांनी केले. त्यांनी याआधी ‘रंग दे बसंती’, ‘देवदास’, ‘भाग मिल्खा भाग’ यासारख्या दिग्गज व मोठ्या चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे. यामध्ये आदिनाथ कोठारे व प्रख्यात ‘अंबर धारा फेम’ सुलग्ना पाणीग्राही एकमेकांसोबत दिसतील.या चित्रपटात प्रसिद्ध हिंदी गायक मोहित चौहान यांनी गाणं गायलं आहे. केतकी माटेगावकर, बेला शेंडे, आनंदी जोशी, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, विश्वजीत जोशी यांनी ‘इश्कवाला लव्ह’ संगीतबद्ध केले आहे. (प्रतिनिधी)