दारूची दुकानं फोडणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात; ५.५५ लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:49 IST2026-05-16T16:49:03+5:302026-05-16T16:49:50+5:30

संगमनेर परिसरातील बियरबार आणि दारू दुकाने फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Interstate gang involved in breaking into liquor shops busted; Goods worth Rs 5.55 lakh seized in ahilyanagar | दारूची दुकानं फोडणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात; ५.५५ लाखांचा माल जप्त

दारूची दुकानं फोडणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात; ५.५५ लाखांचा माल जप्त

घारगाव (अहिल्यानगर) : संगमनेर परिसरातील बियरबार आणि दारू दुकाने फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून संगमनेरसह पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी नाशिक), आकाश सचिन सूर्यवंशी (रा. दत्त चौक, कालिका माता मंदिराजवळ सिडको, नाशिक), मेहताब गुलाम रसूल अन्सारी (मूळ रा. नुरीनगर, कटहार तांडा, ता. निंम्मेगड, जि. गिरटी झारखंड), बंटी दास पूर्ण नाव माहित नाही (रा. झारखंड), किरण रामदास उगले (रा. सामनेर, ता. इगतपुरी, जि. नाशिक), विवेक अरुण उगले (लकी बार रेस्टॉरंट, पळसे, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. यात बंटी दास पूर्ण नाव माहीत नाही (रा. झारखंड), विवेक अरुण उगले (रा. नाशिक) हे फरार झाले आहेत.

घारगाव पोलीस ठाण्यात ३ मे २०२६ रोजी हॉटेल निलायम बार येथे चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी किशोर बाळाजी डोके यांच्या हॉटेलचे शटर तोडून चोरट्यांनी विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. त्यात हा गुन्हा नाशिक येथील सराईत आरोपी हसन हमजा कुट्टी याने साथीदारांसह केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी नाशिक येथे कारवाई करून हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सूर्यवंशी आणि मेहताब गुलाम रसूल अन्सारी यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी झारखंडमधील बंटी दास या फरार साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील माल त्यांनी पळसे येथील लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना विकल्याचे उघड झाले.

चोरीसाठी वाहन पुरवल्याचेही निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ५ हजार १६० रुपयांची विदेशी दारू, १ लाख ५० हजार रुपये किमतीची टाटा इंडिका कार, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान आरोपींकडून संगमनेर तालुका, वावी आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना घारगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

Web Title : शराब की दुकानों को तोड़ने वाला अंतरराज्यीय गिरोह पकड़ा गया; 5.55 लाख का माल जब्त

Web Summary : संगमनेर में शराब की दुकानों को तोड़ने वाला एक अंतरराज्यीय गिरोह पकड़ा गया है। पुलिस ने चार आरोपियों को गिरफ्तार किया और ₹5.55 लाख का माल जब्त किया। संगमनेर सहित पांच मामले हल किए गए हैं।

Web Title : Interstate gang breaking liquor stores busted; Goods worth 5.55 lakhs seized

Web Summary : An interstate gang involved in breaking into liquor stores in Sangamner has been busted. Police arrested four accused and seized goods worth ₹5.55 lakhs. Five cases including Sangamner have been solved.