शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

अहमदनगर : उद्योजकांच्या पाणीपट्टीचे दर वाढविणारा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत़

अहमदनगर : उद्योजकांच्या पाणीपट्टीचे दर वाढविणारा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पूर्वीप्रमाणे म्हणजे १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी मिळणार आहे़ मुळा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचा याचा लाभ मिळणार आहे़उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते़ जिल्ह्यातील तीन औद्योगिक वसाहतींना मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो़ पाणीपुरवठ्याचा खर्च मोठा आहे़ उद्योगांसाठी दररोज मोजून पाणी दिले जाते़ येथील नळांना मीटर बसविलेले आले आहेत़ त्यातून उद्योजक दररोज हजारो लीटर पाणी विकत घेतात़ पूर्वी प्रति हजार लीटरला १८ रुपये, असे दर निश्चित करण्यात आले होते़ मात्र या दरात डिसेंबर २०१३ मध्ये ७ रुपयांनी वाढ करण्यात आली़ त्यामुळे १८ रुपयांवरून पाण्याचे दर २५ रुपये झाले़ परिणामी उद्योजकांना येणाऱ्या पाणीपट्टीत भरमसाठ वाढ झाली़ पाणीपट्टी कमी करण्यासाठी उद्योजकांच्या विविध संघटनांकडून प्रयत्न करण्यात आले़ उद्योजकांच्या मागणीची दखल घेऊन येथील प्रादेशिक कार्यालयाने याविषयीचा प्रस्ताव राज्य औद्योगिक विकास महामंडळास सादर केला़ मात्र गेल्या एक वर्षांत यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही़ औद्योगिक वसाहतींसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विजेचा दर कमी करण्याची मेहरबानी झाली़ पाणी योजनांसाठी प्रति युनिट ५ रुपये ५ पैसे दर, असे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत़ विजेच्या बिलात कपात झाल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा खर्च वाचला आहे़ पाण्याचा खर्च कमी झाल्याने उद्योजकांच्या पाणीपट्टीत कपात करण्यात आली आहे़ पाण्याचे हे नवीन दर चालू महिन्यापासूनच लागू केल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे़नागापूर औद्योगिक वसाहतीसह सुपा- पारनेर आणि नेवासा येथील वसाहतींना मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ मुळा धरण येथून औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली असून, विद्युत मोटारीव्दारे पाणीउपसा केला जातो़ पाणीपुरवठा विभागाला दरमहा १ कोटी २५ लाख रुपये वीज बिल येत होते़ मात्र नवीन निर्णयानुसार ते ७५ लाख इतके येईल़पाणीपुरवठा विभागाचा खर्च कमी झाल्याने उद्योजकांना कमी दरात पाणी देणे शक्य झाले असून, या महिन्यातील पाणीपट्टी नवीन दरानुसार तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)