उंदीरगाव येथे स्वातंत्र्यदिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:29+5:302021-08-19T04:25:29+5:30

उक्कलगाव : तालुक्यातील उंदीरगाव येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुभाष बोधक ...

Independence Day at Undirgaon | उंदीरगाव येथे स्वातंत्र्यदिनी

उंदीरगाव येथे स्वातंत्र्यदिनी

उक्कलगाव : तालुक्यातील उंदीरगाव येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुभाष बोधक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या मंगल पवार यांच्याहस्ते जि. प. शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. भास्करराव पाटील गलांडे विद्यालयात माजी उपसरपंच विरेश गलांडे, तर सर्कल क्रमांक सहामधील शाळेत सुखदेव गाडे, उपसरपंच रमेश गायके यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोना योद्ध्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आरोग्य केंद्राचे डॉ. सुनील राजगुरू, डॉ. रितु लखोटिया यांचा समावेश होता. यावेळी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे, बाभळेश्वर दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, प्रा. सोपान नाईक, ग्रा.पं. सदस्य प्रकाश ताके, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल नाईक, सदस्य दीपक बोधक, बाळासाहेब निपुंगे, सोसायटीचे सचिव रमेश कावडवाले, क्लार्क सुनील आव्हाड, शाळेचे मुख्याध्यापक वारुळे, मनोज बोडके, कचरू भालदंड, अशोक बांद्रे, अशोक पवार, भगवान ताके, संजय काळे, शोएब शेख, विनायक बांद्रे उपस्थित होते.

------

Web Title: Independence Day at Undirgaon