हेरिटेज ट्री योजना ग्रामीण भागातही राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:53+5:302021-06-29T04:15:53+5:30

जामखेड : लिंब, पिंपळ, वड ही झाडे शंभर टक्के ऑक्सिजन देतात व दीर्घ आयुष्यमानाची आहेत. या झाडांची लागवड व ...

Implement Heritage Tree Scheme in rural areas also | हेरिटेज ट्री योजना ग्रामीण भागातही राबवा

हेरिटेज ट्री योजना ग्रामीण भागातही राबवा

जामखेड : लिंब, पिंपळ, वड ही झाडे शंभर टक्के ऑक्सिजन देतात व दीर्घ आयुष्यमानाची आहेत. या झाडांची लागवड व संवर्धन केल्यास शिवाराचे पर्यावरण चांगले राहून पाऊसमान वाढते.

शासनाने हेरिटेज ट्री योजना नागरी भागाप्रमाणे ग्रामीण भागासही लागू करावी, अशी मागणी साहित्यिक, प्रसिद्ध लेखक व बावी गावचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रा. आ. य. पवार यांनी केले.

जामखेड तालुक्यातील बावी येथे वटपौर्णिमेनिमित्ताने पर्यावरण समितीच्या वतीने गट नं. १५० मधील साठ वर्षे वयाच्या वटवृक्षाची पूजा सरपंच नीलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रा. आ. य. पवार, उपसरपंच दादा मंडलिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पवार, लियाकत सय्यद, इमाम पठाण, बाळासाहेब कवादे, दशरथ पाटील, संतोष पवार, सचिन चिकणे, अशोक शिंदे, महादेव कारंडे, राम पवार, अशोक राऊत,

फारूख पठाण, सुनील कारंडे, सतीश पवार आदी उपस्थित होते. ग्रामसेवक बी. व्ही. फरतडे यांनी आभार मानले.

Web Title: Implement Heritage Tree Scheme in rural areas also