शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

युवा सांसदमधून युवकांची वैचारिक देवाण-घेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

अहमदनगर : युवा सांसदच्या माध्यमातून शिक्षण, शेती, कोरोना संकट, सद्यस्थितीच्या उपाययोजना, शासनाचे धोरण युवकांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण होत असून, त्यामुळे ...

अहमदनगर : युवा सांसदच्या माध्यमातून शिक्षण, शेती, कोरोना संकट, सद्यस्थितीच्या उपाययोजना, शासनाचे धोरण युवकांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण होत असून, त्यामुळे युवासांसद ही स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांनी सांगितले.

भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धा खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

टिळक रोड येथील नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात ही स्पर्धा पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक अमोल बागुल, उडान फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंदे, द युनिव्हर्सल फाउंडेशनच्या सचिव आदिती उंडे, सागर अलचेट्टी, नर्मदा फाउंडेशनचे सुनील महाराज तोडकर, दिनेश शिंदे, रमेश गाडगे, सिद्धार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.

आजची युवा पिढी वाचन व संस्काराअभावी भरकटत चाललेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. युवा सांसदच्या माध्यमातून वक्तृत्व विकसित होणार असल्याची भावना आरती शिंदे यांनी व्यक्त केली.

अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर म्हणाले, ‘‘आजचा युवक मोबाइलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युवा सांसदसारख्या उपक्रमाची गरज आहे. युवकांमध्ये वैचारिक बदल घडले पाहिजे. स्पर्धेतून युवक-युवतींना आपले गुण-दोष लक्षात येतात. खेळाडू वृत्ती जपली जाते.’’ युवा सांसदचे परीक्षण अमोल बागुल, अ‍ॅड. महेश शिंदे, आदिती उंडे, आरती शिंदे, अ‍ॅड. सुनील तोडकर यांनी केले. स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. आभार रमेश घाडगे यांनी मानले.

३१ नेहरु युवा केंद्र

जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धेप्रसंगी जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, समवेत महेश शिंदे, आरती शिंदे, आदिती उंडे, सागर अलचेट्टी, सुनील महाराज तोडकर आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)