मित्रासह पतीने केला पत्नीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST2021-09-27T04:23:15+5:302021-09-27T04:23:15+5:30

पाथर्डी (जि. अहमदनगर) : मित्रासह पतीने पत्नीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा ...

Husband abuses wife with friend | मित्रासह पतीने केला पत्नीवर अत्याचार

मित्रासह पतीने केला पत्नीवर अत्याचार

पाथर्डी (जि. अहमदनगर) : मित्रासह पतीने पत्नीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा पती व त्याचा मित्र अशा दोघांवर पाेलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एक वर्षापूर्वी विवाहितेचे लग्न झाले होते. त्यानंतर आठच महिन्यात पती त्रास देऊ लागला. त्यामुळे विवाहिता आई-वडिलांकडे रहायला गेली होती. मागील महिन्यात विवाहिता पाथर्डी तालुक्यातील तिच्या आजोबांकडे राहण्यास आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच तिचा पती आजोबाच्या घरी आला. तिला पुन्हा सासरी नांदायला घेऊन आला. त्यानंतर २२ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास पत्नी झोपलेली असताना पती त्याच्या मित्रासोबत घरात आला. मूल होण्यासाठी मित्रासोबत शरीरसंबंध ठेव, असे पतीने सांगितले. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर पती व मित्राने पत्नीला बळजबरीने दोन गोळ्या चारल्या. त्यानंतर पती, मित्र यांनी अत्याचार केला, असे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.

..........

मूल होण्यासाठी ठेव मित्राबरोबर संबंध

मूल होण्यासाठी मित्राबरोबर दररोज संबंध ठेव, असे पतीने बजावले. यातील कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी २३ सष्टेंबरला रात्री दहा वाजता पती व त्याचा मित्र दोघेही घरी आले. त्यांनी दोघांनी पुन्हा आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार फोनवरून आई-वडिलांना सांगितला, असे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: Husband abuses wife with friend