शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कशी होते ऑक्सिजनची निर्मिती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST

अहमदनगर : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशभरात सध्या व्हेंटिलेटर, बेड ...

अहमदनगर : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशभरात सध्या व्हेंटिलेटर, बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा या भयंकर परिस्थितीत सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे ऑक्सिजन (प्राणवायू)ची निर्मिती कशी केली जाते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चेन्नई येथील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कारखान्यात कार्यरत असणारे अंबादास भापकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ऑक्सिजन निर्मितीची सर्व प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली. अंबादास हे नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील आहेत.

........

प्रश्न : वातावरणातील स्थिती नेमकी कशी आहे ?

अंबादास : आपणाला ऑक्सिजन निर्मिती कशी होते. यापूर्वी वातावरणातील वायू समजून घेणे गरजेचे आहे. वातावरणातील हवेत वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंचा आपणाला उल्लेख करता येईल. पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण ७८ टक्के आहे. तसेच ऑक्सिजन २१ टक्के, आरगॉन ०.९ टक्के आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ०.०३८ टक्के आहे.

प्रश्न : ऑक्सिजन कशा प्रकारे वेगळा केला जातो ?

अंबादास : औद्योगिक वसाहतीमध्ये हवेवर प्रक्रिया करून हवेतून ऑक्सिजन वेगळा केला जातो. या प्रक्रियेला वायू विभाजन (फ्रॅक्शनल डिस्टिलेशन) किंवा ऑक्सिजन, नायट्रोजन सेपरेशन युनिट (एएसयू) म्हटले जाते. या प्रक्रियेत हवेतील वायू वेगवेगळे करण्यात येतात.

...........

प्रश्न : ऑक्सिजन सेपरेशनची प्रक्रिया कशी केली जाते ?

सुरुवातीच्या प्रक्रियेत प्रथम हवेतील पाण्याचे सर्व बाष्प शोषून फिल्टरमधून जाते. या प्रक्रियेत धूळ आणि इतर दूषित पदार्थ फिल्टरद्वारे काढून टाकले जातात. त्यानंतर शीतकरण प्रक्रिया सुरू होते. यात टर्बाइन्स आणि उच्च ऊर्जा रेफ्रिजरेशन सिस्टिमचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन आणि इतर वायू द्रवरूपात येण्यास सुरुवात होते. ऑक्सिजन उणे १८३ अंश सेल्सिअसला (-१८३) हवेतून वेगळा होऊन द्रवरूपात येतो. नायट्रोजन उणे १९६ अंश सेल्सिअसला (-१९६) द्रवरूपात येतो. द्रव रूपात आलेला ऑक्सिजन पाइपलाइनद्वारे टँकमध्ये साठवला जातो. टँकमध्ये साठवलेला ऑक्सिजन टँकरद्वारे किंवा सिलिंडरद्वारे हॉस्पिटल तसेच औद्योगिक वापरासाठी पाठवला जातो. हॉस्पिटलमध्ये द्रवाचे रूपांतर पुन्हा वायूत करावे लागते.

.........

प्रश्न : ऑक्सिजनचा उपयोग कशासाठी केला जातो ?

अंबादास : द्रव किंवा वायू रूपातील ऑक्सिजनचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो. सद्य:स्थितीत आपणाला हॉस्पिटलसाठी सर्वात जास्त ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्याशिवाय अन्न उत्पादन, औषधी आणि अवकाश अन्वेषणासह अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो.

२२ अंबादास भापकर