संस्कार भारतीतर्फे ज्येष्ठ गुरुजनांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:24+5:302021-07-27T04:21:24+5:30

ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. वसंतराव जोशी, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे कुलगुरू व ज्येष्ठ तबलावादक विश्वासराव जाधव आणि ...

Honor of Senior Gurus by Sanskar Bharati | संस्कार भारतीतर्फे ज्येष्ठ गुरुजनांचा गौरव

संस्कार भारतीतर्फे ज्येष्ठ गुरुजनांचा गौरव

ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. वसंतराव जोशी, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे कुलगुरू व ज्येष्ठ तबलावादक विश्वासराव जाधव आणि संगीतगुरू, संगीतकार अंगद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. अहमदनगर समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा, सचिव विलास बडवे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पंडित, योगेश पंडित यांनी या गुरूवर्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल, मोतीमाळ, गणेश प्रतिमा व पुस्तके देऊन त्यांचा सन्मान केला.

याप्रसंगी कवी प्रा. वसंतराव जोशी म्हणाले, आपल्या जीवनात आई-वडिलांपेक्षा गुरूंचे स्थान अधिक मत्त्वाचे आहे. गुरूसेवेने ईश्वरप्राप्ती होते. संस्कार भारतीही संस्कारांचे योग्यरीत्या जतन करत आहे. विश्वासराव जाधव म्हणाले, भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्य परंपरेचे स्थान खूप मोठे आहे. संगीतक्षेत्रात तर या परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या गुरूप्रति आदर म्हणून आज गुरूंचे पूजन केले जाते. संस्कार भारतीने ही परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी गायिका नंदिनी व अंजली उपस्थित होत्या.

फोटो-२६संस्कार भारती

संस्कार भारतीच्या नगर शाखेने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून संगीतक्षेत्रातील तज्ज्ञांचा गौरव केला. अंगद गायकवाड यांचा सत्कार करताना दीपक शर्मा, विलास बडवे, चंद्रकांत पंडित, योगेश पंडित, अंजली व नंदिनी गायकवाड.

Web Title: Honor of Senior Gurus by Sanskar Bharati