शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये गृहनिर्मिती स्थिरावली; नगरपेक्षा ग्राहकांची पुण्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:11 IST

नगर शहरासह जिल्ह््यातील गृहनिर्मितीची प्रक्रिया स्थिरावली आहे. मोठ्या किमतीच्या प्रकल्पांना सध्या थंड प्रतिसाद आहे. शासनाचे अनुदान घेऊन परवडणाºया घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे.

सुदाम देशमुख अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह््यातील गृहनिर्मितीची प्रक्रिया स्थिरावली आहे. मोठ्या किमतीच्या प्रकल्पांना सध्या थंड प्रतिसाद आहे. शासनाचे अनुदान घेऊन परवडणाºया घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. नगर शहरात नव्याने मोठे औद्योगिक प्रकल्प येत नसल्याने आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा कल पुण्याकडे वाढला आहे. आर्थिक मंदीच्या परिणामाबाबत संमिश्र स्थिती असली तरी एकूणच गेल्या चार ते पाच महिन्यांपासून घरांसाठी ४० टक्के मागणी घटली आहे. शहर आणि जिल्ह््यातील बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर बांधकाम क्षेत्रातील ही स्थिती समोर आली. अहमदनगर शहर आणि जिल्ह््यातील बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, बांधकामावरील काम करणारे मजूर यांची एक मर्यादित संख्या आहे. काही प्रकल्पांचे काम बंद पडल्याने आणि काही बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प नव्याने सुरू न झाल्याने मजूरांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. मात्र हे प्रमाण २० ते २५ टक्के असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आर्थिक मंदी किंवा तेजी असली तरी नगरचे बांधकाम व्यवसाय विशिष्ट मर्यादेच्या आत किंवा बाहेर नसतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. चार-पाच महिन्यांपासून नव्याने होणारी गृहनिर्मिती सध्या स्थिर आहे. त्यात फारशी वाढ दिसत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून मागणी घटल्याने ४० टक्के फ्लॅट जसेच्या तसेच आहेत. आर्थिक मंदीचा परिणामाबाबत बांधकाम व्यावसायिकांची संमिश्र मते  आहेत. कोपरगावमध्येही तयार फ्लॅट शिल्लक राहण्याचे प्रमाण आहेत, असे कोपरगावचे व्यावसायिक  प्रसाद नाईक, राजेश ठोळे, श्रीरामपुरचे डॉ. मनोज छाजेड यांनी सांगितले.व्याजाचे दर आणि जीएसटी यामुळे व्यावसायावर निश्चितच परिणाम होतो. अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रासाठी जसे सरकारने पॅकेज दिले आहेत, तसे बांधकाम क्षेत्रासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस नक्कीच येतील. नगर शहराचा विचार केला तर इथे औद्योगिक विकासनाही. तसेच शैक्षणिक संधीही कमी आहेत. जिल्ह्यातील नागरिक नगरमध्ये फ्लॅट घेण्याऐवजी थेट पुण्याकडे जातात, असे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.    आर्थिक मंदीचा बांधकाम व्यवसायावर परिणाम झालेला आहे. फ्लॅट विक्री कमी झाल्यामुळे नवे बांधकाम ठप्प झाले आहे. बांधकाम नसल्याने मजुरांची संख्या कमी झाले आहे. मध्यमवर्गीयांना मंदीचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे त्याचा घरे खरेदीकडे असलेला कल कमी झाला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर आहे. सरकार ज्या घरांसाठी अनुदान देत आहे, त्या घरांना चांगली मागणी आहे, असे  बांधकाम व्यावसायिक अनिल मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ... 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनAhmednagarअहमदनगर