शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या कामकाजाचे वाभाडे

By admin | Updated: October 18, 2014 23:52 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या १५ दिवस आधी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करून तो तालुकास्तरावर पाठविण्यात आला

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या १५ दिवस आधी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करून तो तालुकास्तरावर पाठविण्यात आला होता. मात्र, अद्यापही हा निधी ग्रामपंचायत स्तरावर पोहचलेला नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांमुळे हा निधी रखडला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली स्थायी समितीची बैठक झाली. यात सदस्य बाळासाहेब हराळ आणि राजेंद्र फाळके यांनी हा विषय उपस्थित केला. महिनाभरापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेचा विषय चांगलाच गाजला होता. जिल्हास्तरावरून चुकीच्या निकषांच्या आधारे निधीचे वितरण करण्यात आले असल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला होता. त्यावेळी समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांना लक्ष करण्यात आले होते. त्यानंतर योजनेच्या आराखड्यात बदल करण्यात आला. तसेच निधी मंजूर करून तातडीने तालुकास्तरावर पाठविण्यात आला. मात्र, महिनाभरानंतर हा निधी आहे, त्या ठिकाणी पडून आहे. यामुळे संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली.ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय जात नाहीत. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, याची कल्पना नाही. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही. यामुळेच नगर तालुक्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होऊन आरोग्य विभाग गाफील राहिले असल्याचा आरोप हराळ यांनी केला. त्यावर प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठ दिवसांतून एकदा प्रत्येक उपकेंद्रात उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले. बैठकीला नूतन सभापती मीरा चकोर, सदस्य विठ्ठलराव लंघे, सत्यजित तांबे, सुजित झावरे गैरहजर होते. तर उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती नंदा वारे, शरद नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)