शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

भाविक व पालख्यांविना उत्सव साजरा करणार शिर्डी : परंपरेप्रमाणे साईनगरीत साजरा करण्यात येणाऱ्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला गुरुवारपासून (दि. २२) ...

भाविक व पालख्यांविना उत्सव साजरा करणार

शिर्डी : परंपरेप्रमाणे साईनगरीत साजरा करण्यात येणाऱ्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला गुरुवारपासून (दि. २२) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाप्रमाणेच यंदाचा उत्सवही भक्तांविना साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवाच्या कालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवारी (दि.२२ जुलै) पहाटे साडेचार वाजता काकड आरती, पाच वाजता फोटोची व पोथीची मिरवणूक, सव्वापाच वाजता द्वारकामाई श्रीसाईसच्चरिताचे अखंड पारायण, साडेपाच वाजता मंगलस्नान, सकाळी सहा वाजता पाद्यपूजा, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व सायंकाळी चार ते सहा यावेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता धुपारती होईल. रात्री साडेदहा वाजता शेजारती होईल. या दिवशी श्री साईसच्चरित अखंड पारायणाकरिता द्वारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल.

उत्सवाच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि.२३) सकाळी काकड आरतीनंतर पाच वाजता अखंड पारायण समाप्ती व फोटोची व पोथीची मिरवणूक, सव्वापाच वाजता मंगलस्नान, सकाळी सहा वाजता पाद्यपूजा, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व सायंकाळी चार ते सहा या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती होईल.

.....................

शुक्रवारी गोपालकाला कीर्तन

सांगतादिनी शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी साडेसहा वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी दहा वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर उत्सवाची सांगता होईल. दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी शिर्डी येथे येऊ नये व पालख्या आणू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.