शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षनाथ गड, डोंगरगणला भाविकांची गर्दी तिसरा श्रावणी सोमवार

By admin | Updated: September 1, 2015 16:29 IST

श्रावणी सोमवारची पर्वणी साधत भाविकांनी नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गड येथील गोरक्षनाथ आणि डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळपासून अभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

अहमदनगर : तिसर्‍या श्रावणी सोमवारची पर्वणी साधत भाविकांनी नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गड येथील गोरक्षनाथ आणि डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळपासून अभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथ मूर्तीला आणि रामेश्वर मंदिरात महादेवाला आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते अभिषेक झाला. यावेळी मांजरसुंबा येथील सरपंच जालिंदर कदम, गोरक्षनाथ कदम, जयराम कदम, तुकाराम कदम आदी उपस्थित होते. रामेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमास वांबोरीचे सरपंच उदय पाटील, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे आदी उपस्थित होते. डोंगरगण मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. गोरक्षनाथ गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन आमदार कर्डिले यांनी दिले.दिवसभर भाविकांची गर्दी, प्रसाद व पूजा साहित्याची दुकाने परिसरात थाटली होती. भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी या भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.