शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंविना दसरा मेळावा

By admin | Updated: October 2, 2014 23:49 IST

पाथर्डी : गेल्या पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे हे भगवानगड येथे दसऱ्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते़

पाथर्डी : गेल्या पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे हे भगवानगड येथे दसऱ्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते़ मात्र, त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे-पालवे यांच्या उपस्थितीत पहिलाच दसरा मेळावा भगवानगडावर होत आहे़ या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत होत असलेल्या या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एकनाथ खडसे उपस्थित राहणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या नजराही या मेळाव्याकडे लागल्या आहेत़भगवानगड हा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात येत असल्याने या मेळाव्याला राजकीय महत्व आले आहे. भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाले होते़ भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांची अपार श्रद्धा होती़ दसरा मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित राहत़ त्यांनी भगवानगडाचा मोठा विकास केला़ त्यांच्या शब्दावर अनेकांनी भगवानगडाच्या विकासासाठी योगदान दिले आहे़ यामध्ये तोडणी कामगारांचा मोठा वाटा आहे. मुंडे भगवानगडावर येणार असे समजल्यानंतर राज्यभरातील त्यांचे चाहते मोठ्या संख्येने भगवानगडावर येत़ मुंडेंना येण्यास उशीर झाला तरी त्यांचे विचार ऐकल्याशिवाय कोणीही गड सोडत नव्हते, असा इतिहास आहे. परंतु मुंडे यांच्या अनुपस्थितीत पहिलाच दसरा मेळावा होत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदींना गडावर आणण्याचे स्व. मुंडे यांचे स्वप्न होते. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत पंकजा मुंडे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एकनाथ खडसे यांना आमंत्रित केले असल्याने हा मेळावा अभूतपूर्व करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत होणाऱ्या या दसरा मेळाव्यात राजकीय तोफा धडाडणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या नजराही या मेळाव्याकडे लागल्या आहेत़ (तालुका प्रतिनिधी)