शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

जमलेले लग्न मोडल्याने मुलीनं संपवलं जीवन; तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:28 IST

Ahilyanagar News: जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांतच नकार दिला. जमलेले लग्न मोडल्याने २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 जामखेड (जि. अहिल्यानगर) - जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांतच नकार दिला. जमलेले लग्न मोडल्याने २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि. २७) लग्न जमलेल्या मुलासह त्याच्या आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणी मुलीचे वडील सतीश दादासाहेब सुरवसे (रा. डिसलेवाडी, ता. जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे (हल्ली रा. चिखली कदळवाडी मोशी, पुणे, मूळ रा. कर्जत), अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे ( रा. कर्जत, जि. अहिल्यानगर) या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

मोनिका सतीश सुरवसे (वय २२,रा. डिसलेवाडी, ता. जामखेड) हिचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र, लग्न जमल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२५ ते २७ मार्च २०२५ पर्यंत मुलगा महेश मेंगडे हा तिचा अपमान करत असे. ‘तू मला आवडली नाही’, ‘मला तू मॅच होत नाही’, ‘आपली जोडी शोभून दिसत नाही,’ असे म्हणून मोनिकाचा अपमान करत असे.  मुलाची आई अनुजा मेंगडे व वडील दत्तात्रय मेंगडे हेही मुलीच्या वडिलांना म्हणत होते की, ‘तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभत नाही’. त्यामुळे मुलीचे जमलेले लग्न मोडले. या कारणातून मुलीला मानसिक त्रास झाला. यातूनच तिने गुरुवारी डिसलेवाडी येथे गळफास घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगर