तब्येत संभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:29+5:302021-08-26T04:23:29+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पाऊस थांबला आहे. अचानक तापमानात वाढ झाली असून, वातावरणात सारखा बदल होतो आहे. त्यामुळे ...

Get well, the rain stopped, the heat increased | तब्येत संभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला

तब्येत संभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पाऊस थांबला आहे. अचानक तापमानात वाढ झाली असून, वातावरणात सारखा बदल होतो आहे. त्यामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.

मागील आठवड्यात सर्वत्र पाऊस पडत होता. त्यामुळे गरवा वाढला. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. तापमानात अचानक वाढ झाली आहे. उन्हाचे चटके सोसवेना झाले आहेत. सकाळपासून कडक ऊन पडत आहे. दुपारी तर उन्हाचा पारा चांगला चढतो. त्यामुळे दुपारी बाहेर पडणेही कठीण झाले आहे. ऑक्टोबरमध्ये कडक उन्ह पडते. यंदा ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिट सुरू झाली आहेे. दिवसभर उन्ह आणि रात्री गारवा, असे वातावरण आहे. त्यात पावसामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. सर्दी, खोकल्यासाेबतच डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणात सतत बदल होत असल्याने आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

............

पाऊस

जून ते जुलै

-झालेला पाऊस २६१ मि.मी.

-अपेक्षित सरासरी पाऊस

२०५

ऑगस्ट

-झालेल्या पाऊस- ६४ मि.मी.

-अपेक्षित- ७६ मि.मी.

..........

तापमान

जुलै

कमाल - २९

कमान - २२

.....

ऑगस्ट

कमाल - ३१

किमान - २२

.....

धरणांतील पाणीसाठा दलघफूमध्ये

भंडारदरा- ९,६५७

निळवंडे- ५,५२७

मुळा- १८,०९३

आढळा- ५२२

घारगाव- ५०

घोड- २,३४४

सीना- १०६१

खैरी- ७७

विसापूर- ३,०४२

मुसळवाडी- ४९

टाकळीभान- १८३.२२

.....

वातावरण बदलले, काळजी घ्या

पावसाळा सुरू असून, वातावरण सारखे बदलत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, थंडी, ताप यासारख्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. प्रतिकारक्षमता कमी होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असून, उन्हात जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांना खेळायला सोडू नये. अशी काळजी या काळात घेणे गरजेचे असल्याचे डॉ. सचिन वहाडणे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले.

.....

Web Title: Get well, the rain stopped, the heat increased