शिक्षणच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभा तहकूब

By Admin | Updated: September 20, 2016 00:14 IST2016-09-20T00:10:01+5:302016-09-20T00:14:02+5:30

अहमदनगर : सुरूवातीचे अडीच ते तीन तास शिक्षण विभागाचे दळण दळल्यानंतर अखेर या विभागाच्या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ आली.

The General Assembly adjourned the question of education | शिक्षणच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभा तहकूब

शिक्षणच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभा तहकूब

अहमदनगर : सुरूवातीचे अडीच ते तीन तास शिक्षण विभागाचे दळण दळल्यानंतर अखेर या विभागाच्या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ आली. आता उद्या दुपारी पुन्हा ही तहकू ब सभा घेण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणी योजनांच्या प्रश्नांवर आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कान्हूर पठार योजनेचा विषय सदस्य आझाद ठुबे यांनी मांडला. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी गैरहजर होते. पाणी योजनांचे हस्तांतर, थकीत वीज बिलाचा प्रश्न, मिरी तिसगाव योजनेचे पाणी वापर संस्थेकडे हस्तांतर झाले की नाही, तळेगाव पाणी योजना या विषयावर स्वतंत्र चर्चा करण्यासाठी आठ दिवसांत पुन्हा बैठक बोलवण्याचे आदेश अध्यक्षा मंजुषा गुंड दिले. आरोग्य विभागाने दहा वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रावर १०० कोटी खर्च केलेले आहेत.
मात्र, त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप बाळासाहेब हराळ यांनी केला. जिल्ह्यात साथजन्य रोगाचे औषध नसल्याने सांगितले.
या विषयानंतर मागील सभेच्या इतिवृत्त मंजुरीच्या विषयात पुन्हा शिक्षण विभागाचा विषय निघाला. यात अकोले तालुक्यातील शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचा आरोप सदस्य राजेंद्र फाळके यांनी केला. अखेर शिक्षण विभागावर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
(प्रतिनिधी)
हराळ- पाटील यांच्यात शाब्दिक चकमक
सभेत हराळ यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेत एकटे हराळ बोलत होते. अखेर अ‍ॅड. पाटील यांनी अधिकाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करू नका असे म्हणताच हराळ संतप्त झाले. यातून दोघांत शाब्दिक चकमक झाली. अखेर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने प्रकरणावर पदडा पडला.

Web Title: The General Assembly adjourned the question of education