कोपरगावात जुगारी, हातभट्टी चालकावर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:07+5:302020-12-24T04:19:07+5:30
कोपरगाव : शहरात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी सुरू असलेले जुगार अड्डे व हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यावर पोलिसांनी ...

कोपरगावात जुगारी, हातभट्टी चालकावर गुन्हे दाखल
कोपरगाव : शहरात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी सुरू असलेले जुगार अड्डे व हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यावर पोलिसांनी छापे टाकून बुधवारी (दि.२३) कारवाई केली आहे. या कारवाई रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहरातील कहार गल्ली, इंदिरा शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर, खंदकनाला परिसरात, आण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झापा टाकून २ हजार ९४० रोख तर टाकळी नाका परिसरात सुरू असलेल्या हातभट्टीतून ९०० रुपये किमतीची ९ लिटर दारू हस्तगत केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण शिंदे (४२, रा. टाकळी नाका, कोपरगाव), रफिक बनेमिया सय्यद (४०, रा. गांधीनगर, ता. कोपरगाव), सुनील लहू वायकर (३६, रा. इंदिरानगर, कोपरगाव), आजमअली बाकरअली अन्सारी (४२, रा. खडकी कोपरगाव), इरफान लियाकत दारूवाला (३९, रा. खडकी, कोपरगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.