शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मोर्चा, मंत्र्यांचा निषेध

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याला व आरक्षणाला विरोध करणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांच्या निषेधार्थ

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याला व आरक्षणाला विरोध करणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांच्या निषेधार्थ व आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली़श्रीगोंद्यात मोर्चाश्रीगोंदा : तहसील कार्यालयावर धनगर समाजाने निषेध मोर्चा काढून धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू असा इशारा देण्यात आला़ धनगर आरक्षणाला व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांनी विरोध केल्याचा आरोप धनगर समाजाच्या नेत्यांनी केला़ तसेच आघाडी सरकारचा निषेध करुन आरक्षणाची मागणी केली़ यावेळी श्रीगोंदा कारखान्याचे संचालक आबासाहेब कोल्हटकर, साईकृपा कारखान्याचे अध्यक्ष सदाअण्णा पाचपुते, बबनराव मदने, अ‍ॅड़ रंगनाथ विबे, भाऊसाहेब कोळपे, शहाजी कोरडकर, युवराज चितळकर, दत्तात्रय गावडे, ज्ञानदेव गवते, संतोष धायगुडे, सुनील खरात आदी उपस्थित होते़ कर्जतमध्ये निषेधकर्जत : धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर चक्काजाम आंदोलन करु, असा इशारा सोमवारी (दि. २८) रोजी कर्जत येथे आंदोलकांनी दिला. यावेळी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांचा निषेध करण्यात आला.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथे उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी कर्जत तालुक्यातील धनगर समाजाने तहसील कार्यालयावर मेंढरांसह भव्य मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात सावता माळी मंदिरापासून झाली. या मोर्चात मेंढ्यांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करुन चक्काजाम करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी धनगर समाजाचे नेते धनराज कोपनर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, सेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, रासपचे जिल्हाध्यक्ष भानुदास हाके, महासंग्रामचे तालुकाध्यक्ष भारत मासाळ, डॉ. इंद्रकुमार भिसे, धालवडीचे अध्यक्ष विजय पावणे, अंगद रुपनर, विष्णू देमुंडे आदी उपस्थित होते. आंदोलनाचा इशाराशेवगाव : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (दि़२८) नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घाडगे यांना निवेदन देण्यात आले़ या आरक्षणबाबत त्वरीत निर्णय न घेतल्यास मेंढ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला़ निवेदनावर बापुराव राशिनकर, जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वर राशिनकर, नानासाहेब उगले, दत्तात्रय नजन, लक्ष्मण भिसे, शेषराव कर्डिले, छबुराव मिसाळ, भाऊसाहेब कोल्हे, गोपीनाथ चोरमले, नाना कर्डिले आदींच्या सह्या आहेत़ (प्रतिनिधी)समर्पणचा पाठिंबा नेवासा : धनगर समाजाच्या आरक्षणाला समर्पण फाऊंडेशनच्या वतीने पाठिंबा देण्यात आला़ तहसीलदार हेमलता बडे यांना या पाठिंब्याचे पत्र देऊन आरक्षणाची मागणी करण्यात आली़ धनगर समाज आरक्षण कृती समितीलाही पाठिंब्याचे पत्र देण्यात आले़कर्डिलेंची टीकाधनगर समाजाला राज्यशासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच राज्य सरकारातील काही मंत्रीच या आरक्षणाला थेट विरोध करीत आहे़ धनगर समाजाला आरक्षण देण्यास राष्ट्रवादीचा प्रखर विरोध असल्याची टीका आ. शिवाजी कर्डिले यांनी करंजी (ता़ पाथर्डी) येथे एका कार्यक्रमात बोलताना केली़