धक्कादायक! अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 10:15 IST2019-08-26T09:58:29+5:302019-08-26T10:15:41+5:30
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
पारनेर (अहमदनगर) - पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुणोरे म्हसे खुर्द रोड लगत असणार्या बढे ढवळे वस्तीवर राहणारे बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35)आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) या एकाच कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. बाबाजी विठ्ठल बढे शेती सहा एकर व पशुपालन करुन कुटुंब चालवत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.