भालेराव कुटुंबीयांकडून अन्नदानाचे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:27+5:302021-09-08T04:27:27+5:30

शेवगाव : देशातील ९ राज्यात ११० शाखा व १० लाख खातेदार असलेल्या अग्रगण्य श्री. रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट ...

Food donation activities from Bhalerao family | भालेराव कुटुंबीयांकडून अन्नदानाचे उपक्रम

भालेराव कुटुंबीयांकडून अन्नदानाचे उपक्रम

शेवगाव : देशातील ९ राज्यात ११० शाखा व १० लाख खातेदार असलेल्या अग्रगण्य श्री. रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेचे आधारवड, ज्येष्ठ विश्वस्त रेणुका प्रॉडक्शनचे प्रमुख योगेश चंद्रकांत भालेराव यांच्या अकाली निधनाला बुधवारी (दि. ८) एक वर्ष होत आहे. त्यांचे असंख्य चाहते पुण्यस्मरणानिमित्त मोठ्या संख्येने एकत्र येणार होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनाही बंधूच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे नियोजन करायचे होते. तथापि सध्याची कोविडची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व जाहीर कार्यक्रम टाळून गोशाळांना चारा, निराधारांना, वृद्धाश्रमांना अन्नदान, वस्त्रदान करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र अमरापूर येथील देवस्थानात तसेच अहमदनगर येथील निवासस्थानी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. योगेश यांच्या चाहत्यांनी भावनांना मुरड घालून घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन भालेराव कुटुंबीयांनी केले आहे. कै. योगेश यांचे श्री. रेणुकामाता मल्टी स्टेटच्या विविध शाखांच्या उभारणीत व जडणघडणीत मोठे योगदान आहे. या माध्यमातून देशभरात त्यांचा दांडगा संपर्क आला. विनम्र स्वभावाच्या योगेश यांनी जिवाभावाचा असंख्य मित्र परिवार जोडला. श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री. रेणुकामाता देवस्थानच्या स्थापनेपासून ते दरवर्षी माहूरहून नवरात्रोत्सवाची पायी ज्योत आणायचे. त्यांनी रेणुका प्रॉडक्शनची स्थापना करून ‘माझी रेणुका माउली’ ही ५२ भागाची मालिका टीव्हीवर प्रक्षेपित केली. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे अचानक जाणे मोठा आघात होता. (वा. प्र.)

--

फोटो- ०७ योगेश भालेराव

Web Title: Food donation activities from Bhalerao family