तलावात मासेमारीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:57+5:302021-07-20T04:15:57+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे अंतिम तलावातील कालव्याच्या मोरीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय अडकल्याने मृत्यू झाला. पोलीस ...

For fishing in the lake | तलावात मासेमारीसाठी

तलावात मासेमारीसाठी

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे अंतिम तलावातील कालव्याच्या मोरीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय अडकल्याने मृत्यू झाला.

पोलीस यंत्रणेने मोहीम राबविल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मयताचे नाव रमेश देवराम सुरसे (वय २५) असे आहे. तो दोन सहकाऱ्यांसमवेत मासेमारीसाठी गेला होता. कालव्याला पाणी सोडण्यासाठी दोनशे फूट सिमेंटची मोरी आहे. तेथे मासे मिळून येत असल्याने सुरसे हा अनेकदा जात होता. मात्र रविवारी मोरीतील गजाला पाय अडकल्याने त्याचे जागेवरच निधन झाले.

त्याचे सहकारी मोरीच्या तोंडाजवळ वाट पाहत बसले. मात्र बराच वेळ होऊनही सुरसे बाहेर आला नाही. तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. जलसंपदाचे कर्मचारी, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मदतकार्य हाती घेऊन ५० ते ६० फूट मोरीच्या आत सुरसे याचा मृतदेह मिळून आला. पोलीस हवालदार आयुब शेख यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

------------

Web Title: For fishing in the lake