एका वर्षानंतर प्रथमच भाविकांनी फुलले सिद्धटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:11+5:302021-02-05T06:29:11+5:30
सिद्धटेक : कोरोना महामारीनंतर तब्बल एका वर्षानंतर काल संकटी चतुर्थीनिमित्त सिद्धटेक भाविकांनी फुलले. येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी ...

एका वर्षानंतर प्रथमच भाविकांनी फुलले सिद्धटेक
सिद्धटेक : कोरोना महामारीनंतर तब्बल एका वर्षानंतर काल संकटी चतुर्थीनिमित्त सिद्धटेक भाविकांनी फुलले. येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. दर्शनबारीमध्ये भाविकांची मोठी रांग लागली होती. खूप दिवसांनंतर गणरायाचे दर्शन होत असल्याने गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
व्यवसायाची सुरुवात झाल्याने मंदिर परिसरातील व्यावसायिकांमध्ये ग्राहकांची सेवा करण्यात उत्साह होता. मंदिराच्या प्रवेशद्वार परिसर स्वच्छता असल्याने काही भाविकांनी मंडपातच बैठक मारली होती. दर्शनबारीमध्ये ठरावीक ठिकाणीच प्रकाश व्यवस्था केल्याने, इतरत्र अंधारच भाविकांना मार्ग काढावा लागत होता. पुणे जिल्ह्यातून येणारी वाहने नदी काठावरील पार्किंगमध्ये लावली, परंतु मंदिराच्या पूर्वेकडे वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकाने, ट्रॅव्हल बस, खासगी वाहने, मोटारसायकल, अवजड वाहतुकीची वाहने रस्त्याच्या कडेलाच लावल्याने प्रवासी व भाविकांचे हाल झाले. यामुळे पूर्वेकडील पार्किंगचा प्रश्न लवकर सुटणे गरजेचे आहे. पुढील चतुर्थी अंगारक आहे, तसेच माघ जन्मोत्सव यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी करून योग्य नियोजन करावे. सिद्धटेक विकास आराखड्याप्रमाणे मंजूर असणारी लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी गणेशभक्त करीत आहेत.
फोटो दोन : ३१ सिद्धटेक, १
सिद्धटेक येथील गणेश दर्शनासाठी मंदिरातील भाविकांची गर्दी व बाहेर लागलेली रांग.