केलवडमध्ये चार दिवसांत पंधरा जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:44+5:302021-09-06T04:25:44+5:30

चार दिवसांत १० शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली. नानासाहेब राऊत यांच्या ३, संदीप गमे यांची १, किशोर गमे यांच्या २, ...

Fifteen animals died in four days in Kelvad | केलवडमध्ये चार दिवसांत पंधरा जनावरांचा मृत्यू

केलवडमध्ये चार दिवसांत पंधरा जनावरांचा मृत्यू

चार दिवसांत १० शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली. नानासाहेब राऊत यांच्या ३, संदीप गमे यांची १, किशोर गमे यांच्या २, मच्छिंद्र गमे यांची १, लक्ष्मण घोरपडे यांची १, अण्णासाहेब घोरपडे यांची १, अशोक घोरपडे यांची १, रमा सोनवणे यांच्या २, बाळासाहेब जटाड यांची १, वसंत ठोंबरे यांची २ जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शैलेश बन, पंचायत समिती पशू अधिकारी किशोर शेळके, प्रवीण नेहरकर, भारत कापडी, डॉ. विकास गमे, डॉ. विजय चौधरी, डॉ. नितीन शेळके, डॉ. शरद गमे, डॉ. राहुल घोरपडे, डॉ. बाप्पू घोरपडे, बबन मेचे, अण्णासाहेब घोरपडे यांनी गावात पाहणी करत जनावरांचे रक्ताचे नमुने घेतले. रविवारी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. पी. वाय. ओहळ, बाळासाहेब गमे, अंजाबाप्पू जटाड, उपसरपंच विशाल वाघे, निकेत घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

रविवारी दगावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना शासकीय सर्टिफिकेट देण्यात येणार असून, नुकसान भरपाईविषयी प्रयत्न केले जातील, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. पी. वाय. ओहळ यांनी दिली.

..............

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची टीम केलवड गावात पाठविण्यात आली आहे. रक्ताचे नमुने तपासणीस पाठविले आहेत. खुरकुत, घटसर्प व गोचिड ताप असल्याचे लक्षात येत आहेत. विकत घेतलेल्या जनावरांना लस देऊन १५ ते २१ दिवसांनंतर गोठ्यात घ्यावीत, त्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल.

- डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, अहमदनगर

.................

केलवड गावात पाच ते सहा हजार लिटर दूध दैनंदिन जमा होते. सध्या गावात २५० ते ३०० जनावरे बाधित आहेत. शासनाने पशुपालकांना मदत करावी.

- अंजाबाप्पू जटाड, पशुपालक, शेतकरी,

................

गावातील पाच पशुपालकांनी नेवासा व प्रवरानगर येथे जनावरांचे रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी नेले होते. त्यात खुरकुत, गोचिड ताप व घटसर्प यांचा अहवाल आला आहे. जनावरांवर उपचार सुरू आहेत. ढगाळ आणि थंड हवामानामुळे आजारात वाढ होत आहे.

- डॉ. विकास गमे, केलवड, राहाता

-----

फोटो : अस्तगाव

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या गोठ्याची पाहणी करताना पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी.

Web Title: Fifteen animals died in four days in Kelvad