नेवासा : नेवासा परिसरात केबल व मोटारी चोरणाऱ्या चोरांच्या टोळीस नेवासा पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये सहा गुन्हे उघड झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मोटार व केबल चोरीचे सत्र सुरू होते. यामधील पाच चोरट्यांना नेवासा पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले.
मोटार व केबल चोरी गेल्याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात सहा फिर्यादींवरून चोरीचे गुन्हे दाखल होते.
पोलीस निरीक्षक विजय करे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा परिसरात केबल व मोटार चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात यश आले. मोहन आप्पासाहेब जाधव, करण सीताराम जाधव, गणेश ऊर्फ सोन्या अशोक गव्हाणे, महेंद्र नामदेव जाधव (सर्व रा. भेंडा, ता. नेवासा), विष्णू चंदू कडमिंचे (रा. रामनगर, शेवगाव) यांना अटक केली. त्यांनी चोरी केलेली केबल व मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.